मनातल्या मनात...!
Submitted by Swati Karve on 3 February, 2021 - 12:16
मनातल्या मनात...!
जाणिवांच्या बेड्या
सतत सोबतीला असतात.
विचारांच्या सावल्या तर
पाठलागचं करीत असतात.
मन नावाच्या सागरात
विचारांचे तरंग उठत राहतात.
भावनांची वादळं अवचित
येत जात असतात.
उपभोग आणि षड्रिपुंच्या
लाटा तर सतत
तांडवचं करीत असतात.
आयुष्याच्या क्षितीजावर
निर्मात्याने उधळलेले
ते गूढ, पण तितकेच
विलोभनीय, अदभुत रंग
या वेड्या जीवाला सतत
अचंबित करीत राहतात!
- स्वाती
विषय:
शब्दखुणा: