स्वगत लेखणीचं...
Submitted by माणक्या on 21 September, 2010 - 07:29
एकदा एका साहित्य संमेलनात
नेहमीप्रमाणे अध्यक्षपदाचा गोंधळ संपल्यावर
अन सगळे औपचारिक सोपस्कार उरकल्यावर
.. सुरुवात झाली अखेर संमेलनाला अन कुजबुजण्याला..
त्या गदारोळात एक लेखणी स्वतःहून पुढे आली
शांतता पसरताच तत्क्षणी ती बोलती झाली..
'आज बोलावच लागणार आहे मला
कारण माझ्या दोन्ही बाजूला दिसणारी विसंगती
अता अजूनाजून ठळक होत चाललीये
शाईतून प्रेम उतरवणारे हात भलत्याच निर्यांना हात घालू लागलेत
प्रश्न पडणं साहजिक आहे की खरं नेमकं काय
कागदी प्रेम की प्रेमळ कागदीपण?
जेव्हा शाईतून उमटलं कागदावर तेव्हाचे उमाळे खोटे होते?
की लिहून झाल्यावर मनात जागलेलं श्वापद खरं होतं?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा