माझी ( भंगलेली ) स्वप्ने :-)
Submitted by डी मृणालिनी on 19 September, 2020 - 10:58
मी लहान असताना ( म्हणजे आताही लहानच आहे ) पण खूSSप लहान असताना 'मी मोठी होऊन काय बनणार ' यावर नेहमी विचार करायचे. मोठ्या माणसांचा तर हा आवडता प्रश्न. कोणी लहान मुलं दिसलं कि हा प्रश्न हमखास विचारतातच . काही मुलांना तो अगदीच नकोसा वाटतो तर काही मुलं अगदी याच प्रश्नाची वाट पाहत असतात. मीही त्यातलीच . मला पण हा प्रश्न विचारलेला आवडायचा. दरवेळी हा प्रश्न तस्साच असला ,तरी माझं उत्तर मात्र बदलत राहायचं.
विषय:
शब्दखुणा: