निरागस

प्राजक्त तुझ्या आठवांचा

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 05:01

प्राजक्त तुझ्या आठवांचा ओघळला मनात।
मंद मंद सुगंध त्याचा दरवळतो मनात ।।
अवचित ह्या सांजवेळी झाली तुझी आठवण ।
त्या सांज छटा पाहुन गहीवरले माझं मन।।
ओंजळीत घेऊन त्या स्मृतिफूलांचा मी सुगंध घेतो।
गोंजारून त्या नाजूक आठवणी हृदयांत जपतो।।
असाच अचानक कोसळला पाऊस नी भिजलिस तू पार चिंब।
डोळ्यांत आजुन साठून आहेत ते केसातुन मोत्यांचे ओघळते थेंब।।
तुझ्या गजऱ्याचा सुगंध अजून माझ्या श्वासांत भरला आहे।
निश्वास अजुनी त्या क्षणा नंतर मी कुठे सोडला आहे।।
खळ्खळ्णाऱ्या हास्याची नी निरागस डोळ्यांची तुझ्या अजून भूल आहे।

लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय

Submitted by तो मी नव्हेच on 24 August, 2020 - 22:01

'मी नाही गौरी आणू देणार घरी', पोरगी खट्टू होत म्हणाली
अन् लहान मोठे आघात झेललेलं माझं मन थोडं हबकलंच
अपशकुनांना घाबरत...
मग थोडा तिला दटावूनच म्हणालो,
असे बोलतात का कधी, गणपती बाप्पा रागवेल हं...
त्यावर लेक म्हणाली चेहऱ्यावरचा भाव न बदलता,
अरे पण ती त्याची आई आहे, त्याला घेऊन जायला येते ना
मला नाही द्यायचा आमचा जी बाप्पा...
मी नाही तिला आणू देणार घरी....
अन् त्या अजाण निरागसतेमधलं धारिष्ट्य भावले मला...
कुठे हरवून बसलोय अशी निरागसता मी?
हवी आहे ती मला... लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय

Subscribe to RSS - निरागस