विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.
पुरुष एकेरी :