टीव्ही, टीआरपी अन त्याचं गणित
Submitted by DJ.. on 28 July, 2020 - 01:24
टी.आर.पी. म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट.
टी.आर.पी.चं गणित डिजिटल सिग्नलिंग मुळं खुप सोप्पं झालंय. कुठल्या चॅनेलच्या कोणत्या सिरियल ला किती व्युज मिळतात हे एका मिनिटात कळतं. तुम्ही जाता जाता नुसतं सर्फिंग करताना १ मिनिट एखाद्या चॅनेलवर थांबला तरी तो त्या चॅनेलचा व्यु असतो. त्यामुळं टीआरपी जास्त असणार्या मालिका ह्या खरोखर चांगल्या असतीलच असं नव्हे. प्राईम टाईम मधे बरेच लोक टीव्ही समोर येऊन सर्फिंग करत बसतात. जास्त लोक एकाच वेळी कोणत्या स्लॉट मधे टीव्ही समोर येतात तो प्राईम टाईम असतो आणि या वेळात कोणत्या चॅनेलच्या कोणत्या कर्यक्रमांना किती व्युज मिळाले तो असतो टीआरपी
विषय:
शब्दखुणा: