पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा
Submitted by पाषाणभेद on 10 July, 2020 - 18:38
एका व्हाअॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.
आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
विषय:
शब्दखुणा: