गणपती बाप्पा मोरया...मोरया
Submitted by पाषाणभेद on 10 September, 2010 - 20:36
गणपती बाप्पा मोरया...मोरया
मंडळी, आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो. मोठ्या पटांगणात तयारी केली आहे अन गल्लीतली सगळी पोरे घेवून हिरो नाचत आहे.
(या सिन नंतर लगेचच एक फायटिंगचा सिन असल्याने हिरोच्या मदतीला साईड हिरो पण या गाण्यात आहे.)
चाल: नेहमीचीच...म्हणजे पिच्चरमधली...
हिरो नं १ :
चला रे चला नाचू या गावू या
बोला रे बोला गणपती बाप्पा मोरया...मोरया ||धृ||
हिरो नं १ :
ढोल ताशे हे असे जोरात वाजती
रंगात येवूनी पोरे ही नाचती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा