एक पुरवता अंगावर येतो काटा

एक पुरवता अंगावर येतो काटा

Submitted by बेफ़िकीर on 28 November, 2019 - 18:32

एक पुरवता अंगावर येतो काटा
=====

एक पुरवता अंगावर येतो काटा
इच्छा म्हणजे महासागराच्या लाटा

फार फायदेशीर जगासाठी ठरतो
मी करतो व्यवसाय जिथे होतो घाटा

काही केले तर कोणी बोलत नाही
नाही केले, त्याचा होतो बोभाटा

कान लाव तू, ऐक बोलते प्रेत किती
जन्म आपल्या सगळ्यांचा, हा सन्नाटा

प्रत्येकाचा जोडीदार म्हणत असतो
फार वेगळ्या होत्या रे अपुल्या वाटा

तुला जायचे होते कायम पुढे म्हणुन
चालत बसलो तसाच मी ठेवत काटा

गाव फार तर एक उंबऱ्याचे होते
हायवेहुनी मोठा होता पण फाटा

Subscribe to RSS - एक पुरवता अंगावर येतो काटा