दुनियेस वाटते
Submitted by santoshchavan on 26 November, 2019 - 09:06
तु दिलेल्या जुन्या आठवणीत आहे
दुनियेस वाटते की मी नशेत आहे
नाही मांडत हल्ली हिशोब विरहाचा
दुनियेस वाटते की मी मजेत आहे
कवताळतो हल्ली फक्त जखमांना
दुनियेस वाटते की मी प्रेमात आहे
जळताना मला पाहिले होते सर्वानी
दुनियेस वाटते की मी स्वर्गात आहे
विषय:
शब्दखुणा: