निवारा

घर

Submitted by कांचनगंगा on 24 November, 2019 - 06:19

घर

घर म्हणजे फक्त चार भिंतींचा निवारा नाही,
घर असतं थकल्या जीवाला जोजवणारी अंगाई!

वास्तवाच्या धुमश्चक्रीत, दोन हात करून येता,
घर होतं जखमेवर फुंकर घालणारी आई!

छोटे डाव, मोठे फड जिंकून येता,
घराच्याच डोळ्यात काठोकाठ अपूर्वाई!

पंख फुटल्या पाखराला निरोप देताना,
घर असतं हातावरचं चमचाभर दही;

घर म्हणजे फक्त चार भिंतींचा निवारा नाही!

कांचन

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निवारा