तू खिच मेरी फोटू
Submitted by _तृप्ती_ on 11 October, 2019 - 00:36
पाटलाच्या वाड्यावर कालपासनं लईचं गडबड सुरु व्हती. धाकलं मालक आलेत नव्ह अन त्यांच्या परिस ४-५ पोरंपोरी बी आल्याती. त्यांना म्हणे पाटलाचं शेत बघायचं व्हतं, गाव कसं असतंय, शेतात काम कसे करत्यात लोकं, असलं काय न काय. तसं काय त्यांचा कुणास त्रास बी नाय काय. पाटलाचा वाडा ह्यो मोठा. राहतंय कोन, पाटील अन वहिनीसाहेब. ते बी खुश व्हतं पोरंपोरी आल्यात म्हून. तस म्हणजी समदं आलबेल होतं म्हना की. आता ह्यात एकाच मानसाला लई तरास व्हतं व्हता. मंगी, म्हंजी तसं तिचं नाव हाय मंगल. पन समद्या गावाची मंगीच. मंगी पाटलाकडं लहान असल्यापासनं कामाला.
विषय: