सोळा आण्याच्या गोष्टी - खरा देव - दत्तात्रय साळुंके
Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 September, 2019 - 01:55
रविवारी लवकर जाऊन देव धरला की वरखर्च निघतो. उशिर झाल्याने पटकन सुचिर्भूत होऊन, सोवळे नेसून तो निघाला. ताम्हणात फुले,पत्री, कुंकू, नाणी, वीस, पन्नासची नोट, भंडार, खोबरं घेतलं.
एखादा दुय्यम देव पकडून, जाणा-या येणा-याला दर्शनाची गळ घालायची हेच काम.
घाईतच कार्यस्थळी पोहचला. समोरचं दृश्य पाहून जागेवरचं खिळला. तो ज्या देवळात बसायचा तिथे एका मयताचा पंचनामा चाललेला.
प्रेताच्या बाजुलाच त्याच्या हातातल्या सारखीच दोन ताम्हणे , विखुरलेली फुलं,भंडारा, नाणी, रक्ताने माखलेला दगड.
सहज देवळात पाहीले. देव जागेवर नाही. घरी येताच तापाने फणफणला.
विषय:
शब्दखुणा: