
नमस्कार मायबोलीकर, दरवर्षी प्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एक उत्साहपूर्ण उपक्रम "करकटवलेली चित्रे!"
करकटवलेली चित्रे (Rainbow scratch paper art) म्हणजे एका कागदावर क्रेयॉन्स घेउन मुक्त रंगपंचमी खेळायची आणि मग कागद पूर्ण भरला की त्याच्यावर पूर्ण काळा क्रेयॉन फासायचा आणि मग करकटक (किंवा कोणत्याही टोकदार वस्तू) ने एखादे चित्र रेखाटायचे ज्यामुळे वरचा काळा कलर खोडला जावून मागच्या रंगीबेरंगी रंगात ते चित्र उमटते.
उदाहरणार्थ:
वाजत गाजत, थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या, समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीनच उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.
त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
मायबोली गणेशोत्सव २०१९चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोहोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रार्थना/आरत्या लिहू शकता .
तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका.. अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कुळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंच खाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत... हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं??? नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
चित्रकाराने कागदावर रेखाटले असले, तरी पाहणाऱ्याच्या मनावत मनात त्याचा कुंचला काही वेगळेच रंग भरत असतो.
ते रंग त्या चित्राहूनही जास्त गहिरे असतात..... तर कधी एखादा वेगळाच पैलू आपल्याला जाणवतो जो अजून अव्यक्तपणे चित्रांच्या वळणदार आकारांमध्ये लपून बसलेला असतो.
चित्र पाहून मनात येणाऱ्या भावनांचे रेखाटन आपण आपल्या चारोळीत मांडण्याचा प्रयत्न करूया का?
चला तर मग.....
आंतरजालावरून मिळालेल्या चित्रांकडे पाहून मनात उमलणारी फुले शब्दांत गुंफा. आणि करा सुंदर चारोळी!
नियम :-
१. संयोजक रोज एक चित्र देतील.
२.दिलेल्या चित्रावर समर्पक अशी चारोळी करायची आहे.