नमस्कार मायबोलीकर, दरवर्षी प्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एक उत्साहपूर्ण उपक्रम "करकटवलेली चित्रे!"
करकटवलेली चित्रे (Rainbow scratch paper art) म्हणजे एका कागदावर क्रेयॉन्स घेउन मुक्त रंगपंचमी खेळायची आणि मग कागद पूर्ण भरला की त्याच्यावर पूर्ण काळा क्रेयॉन फासायचा आणि मग करकटक (किंवा कोणत्याही टोकदार वस्तू) ने एखादे चित्र रेखाटायचे ज्यामुळे वरचा काळा कलर खोडला जावून मागच्या रंगीबेरंगी रंगात ते चित्र उमटते.
उदाहरणार्थ:
अधिक माहितीसाठी
उपक्रमाचे नियम:
१) छोट्या दोस्तमंडळींसाठी हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडी नेच भाग घ्यायचा आहे.
४) बाजारात तयार रेनबो स्क्रॅचपेपर मिळतात ते वापरले तरी चालेल.
५) वयोगट - १४ वर्षां खालील मुला मुलींसाठी.
६) चित्रे पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)
९)
१. मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण
२.पिकासा ते मायबोली फोटो देणे
१०) प्रवेशिका "करकटवलेली चित्रे- पाल्याचे नाव" या नावाने द्यावी.
११) चित्रांना विषयाचे कुठलेही बंधन नाही
१२) चित्रे गणेश चतुर्थीपासून २ सप्टेंबर २०१९ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत १२ सप्टेंबर २०१९ (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.