मटमट्या (पिंगळा घुबड)
Submitted by Dr Raju Kasambe on 2 August, 2019 - 09:48
मटमट्या (पिंगळा घुबड)
करतो विदुषकी चाळे
मान त्याची सर्वत्र वळे
मोठमोठे बटबटीत डोळे
वाकुल्या दाखवितो बळे
सांजवेळी बाहेर पडतो
मटमट्या आम्हाला बघतो
गिचीडमिचीड कर्कश बोलतो
रात्रीची घोषणा करतो
लक्ष्मिचे वाहन असे तो
तिन्ही लोकीची सफर घडवीतो
शेतकऱ्यांचा खरा दोस्त
किडे-उंदरांना करतो फस्त
धरणीवरती बहू प्रजाती
प्रसार सर्वत्र भूलोकी
शब्दखुणा: