हा जगून कोठे गेला
Submitted by बेफ़िकीर on 1 May, 2019 - 13:07
हा जगून कोठे गेला
तो मरून कोठे गेला
मी कुठून आलो येथे
तो कुठून कोठे गेला
धावत्या सुखांचा जथ्था
"ये"म्हणून कोठे गेला
मी जमीन कोठे घ्यावी
ढग वरून कोठे गेला
श्वास त्यागण्या जगते जग
पण अजून कोठे गेला
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: