प्रलय

प्रलय-०२

Submitted by शुभम् on 23 March, 2019 - 00:37

प्रलय-०२

भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात सापडला होता . त्या सैनिक पथकाचा प्रमुख , अधीरत होता , तो म्हणाला " भिल्वावा आता तुझा खेळ संपला , उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......

" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?

" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे.....

शब्दखुणा: 

प्रलय-०१

Submitted by शुभम् on 22 March, 2019 - 03:05

उपोद्घात

" विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजेन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......!

" महर्षी , कोण ' ती '....? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....? आणि हे कधी , कधी होणार आहे ? मला फार चिंता वाटत आहे ...?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रलय