काय होतीस तू बघत परवा
Submitted by बेफ़िकीर on 16 January, 2019 - 09:39
गझल - काय होतीस तू बघत परवा
=====
काय होतीस तू बघत परवा
काय होतीस तू दिसत परवा
सर्व चटके जरी दिसेनासे
वाहिले रक्त भळभळत परवा
काल किंवा उद्या न येवो पण
येत राहो परत परत परवा
तू भरवलास घास गोडाचा
ते कडू क्षण पुसत पुसत परवा
वाचली नेमकी गझल त्याने
नेमके तेच वाचवत परवा
तूच नव्हतीस एकटी तेथे
हेच नव्हते मला कळत परवा
हात हाती दिलास तू माझ्या
घेतला श्वास पूर्ववत परवा
माणसे 'बेफिकीर' भवताली
एकजण बस तुझी करत पर्वा
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: