गझल - डोल बाहुल्या डोल

गझल - डोल बाहुल्या डोल

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2019 - 08:36

गझल - डोल बाहुल्या डोल
=====

डोल बाहुल्या डोल, तुझे तर काम डोलणे आहे
हे कळणे अपुले अपुल्याला, हे सखोलणे आहे

सुस्कारे, आदळआपट, टोमणे, मने जोजवणे
आपल्यात संवाद जास्त अन कमी बोलणे आहे

पोरउन्हाचे जावळ काढत उग्रवर्ण वागवणे
खिन्न हिवाळी वाटेवरचे धुके तोलणे आहे

वृक्षांना का जीवन मिळते, वृक्षांना पाहू दे
कार्य तुझ्या शेवाळ्याचे तू गुपित खोलणे आहे

कुंकवास विधवा नाकारे महत्प्रयासे येथे
अर्वाचीन रुढींची भक्कम साल खोलणे आहे

नादाला लागूच नका, मग विषय असो कुठलाही
'बेफिकीर'चे काम चुकीच्यांनाच कोलणे आहे

Subscribe to RSS - गझल - डोल बाहुल्या डोल