दिवेकर

पोटाचा प्रश्न

Submitted by सदा_भाऊ on 25 December, 2018 - 04:10

पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहतो असं कोणातरी व्हाटसॲपीय विद्वानाने म्हणून ठेवलंय. या विधानामधे १००% सत्यता असून मीही त्याचा एक नरबळी आहे. कोणतीही सोंगं करता येतात पण बारीक होण्याचं सोंग करता येत नाही हे तत्वज्ञान अनुभवा वरून सिध्द झालेले आहे. आजकाल मी माझ्या वाढत्या वयाला दोष द्यावा का माझ्या कामाच्या पध्दतीला का माझ्यातल्या आळसाला हा जरी आमच्या घरगुती वादाचा मुद्दा असला तरी वाढते वजन हा निर्विवाद राष्ट्रिय प्रश्न होऊ घातला आहे. दशवर्षीय कन्येपासून पंचषष्ठदश वर्षीय मातोश्री पर्यंत सर्वाना पडलेला हा एक ज्वलंत प्रश्न आहे.

विषय: 
Subscribe to RSS - दिवेकर