टाळतो कशाला
Submitted by शिवाजी उमाजी on 14 December, 2018 - 01:18
टाळतो कशाला
बोलावतो प्रथेने तू भाळतो कशाला
देतोय मान जेव्हा तू टाळतो कशाला
होणार पुर्ण ईच्छा आता मनातली ती
चिंता उगाच ध्यानी तू पाळतो कशाला
ना छंद तीज फूले केसात माळण्याचा
नाही म्हणून सुद्धा तू माळतो कशाला
गात्रे जरी तुझी रे सारी शिथील झाली
अश्रूंस मोल मोठे तू गाळतो कशाला
आनंद या सुखाचा नाही जरी मिळाला
बा थेंब थेंब अश्रू तू ढाळतो कशाला
कैफात भारलेला स्वार्थी इथे जमाना
ऊगाच जीव दोस्ता तू जाळतो कशाला
विषय:
शब्दखुणा: