सांज सावळी
Submitted by शिवाजी उमाजी on 14 December, 2018 - 01:12
सांज सावळी
सावळी सांज...ढळण्या आली
आठवण प्रिया छळण्या आली
खास चांदणे.....जसे उगवले
परतुनी रात...फिरण्या आली
ऐकता एक......सुर वाऱ्याचा
रूसली बाग..फुलण्या आली
शिंपन करून...ढग तो जाता
माती गंधा.....भुलण्या आली
तो शांत तसा...निजला होता
होऊन लाट..भिजण्या आली
जरी भांडली.....ऊन सावली
संध्या छाया....रमण्या आली
©शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t30406/new/#new
विषय:
शब्दखुणा: