गझल - सांग कोठे जगायचे आहे
Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2018 - 11:57
गझल - सांग कोठे जगायचे आहे
=====
सांग कोठे जगायचे आहे
सांग कोणास भ्यायचे आहे
हात सोडा, नका पुढे नेऊ
जाणिवांना थिजायचे आहे
काय करशील भूमिका त्याची
त्यास तर विंग व्हायचे आहे
गाजणाऱ्यास सोड, धर, ज्यांना
शेवटी प्रेत न्यायचे आहे
काय केलेत आपल्यांसाठी
काय सांगा करायचे आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: