इतक्यात सखे गं..
Submitted by खुशालचेंडू_केपी on 28 September, 2018 - 06:38
प्रीतीचा आपुल्या पालव असा तू खुडलास का ?
इतक्यात सखे गं डाव नवा तू मोडलास का ?
केले प्रेम तुझ्यावर मी गं सच्च्या दिलाने ,
माझ्यासवे खेळ खोटा तुझा तू मांडलास का ?
असते प्राशले विष तू माझ्या विश्वासाखातर ,
हृदयी माझ्या प्याला भ्रमाचा तू सांडलास का ?
घेतलास जगी तू शोध तुझ्या आत्म्याचा ,
माझ्या मधला जीव तुझा तू ताडलास का ?
केलास हट्ट पूरा तू आपुल्या सहवासाचा ,
अधुऱ्या कहाणीचा पायंडा तू पाडलास का ?
स्वर्गाला केलेस माझ्या, अपघाताचा ठाव तू ,
प्रेमाचा गं असा अर्थ नवा तू काढलास का ?
विषय:
शब्दखुणा: