Android आणि ईतर OS वर फाईल शेअरींगसाठी अनेक पर्याय ऊपलब्ध आहेत. शेअरइट सारखी ॲप्सही आहेत. पण त्यांना अनेक मर्यादा येतात. पण macOS आणि iOS मध्ये फाईल शेअरींगसाठी AirDrop ही सुविधा आहे. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या फाईल सहजतेने Apple Devices मध्ये शेअर करु शकता. तर या लेखात AirDrop कसे वापरायचे ते पाहूयात.
1. प्रथम Mac वर Finder window मधुन "AirDrop" वर क्लिक करा. (या ⇧+⌘+R हा किबोर्ड शॉर्टकट वापरता येईल.)
macOS च्या Mail App मध्ये AutoResponder कसे सेट करायचे ते या लेखात पाहुयात.
बऱ्याचदा मित्रांकडून विचारना होते की "नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल." मग त्याला थोडी-फार माहिती देतो. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मायबोली’वर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल.
बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे. ImageOptim सुरु आहे. अगोदरचे QuikTime Player ओपन आहे. प्रत्यक्षात मी Pages मध्ये काम करत असलो तरी ही सगळी ॲप्स बॅकग्राउंडला ओपन आहेत.