सैरभैर सावली

--सैरभैर सावली--

Submitted by Nilesh Patil on 18 May, 2018 - 12:05

--सैरभैर सावली--

सैरभैर सावली झाडांची आता नेली कुणी?
हरली ती की चोरून नेली कुणी..?

हा रस्ता आता तापत आहे सुर्य किरणांनी,
झाडांवरी घाव असे देऊनी गेले कुणी..।

घेत होते विसावा चार जीव यांखाली,
आसरा गेला जसा,हिसकावून नेला कुणी..।

पानझडी ऋतू आता येऊनी उपयोग नाही,
झाडांचीच गळती अशी करुन गेला कुणी..।

--निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-9503374833--

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सैरभैर सावली