--बहार--
Submitted by Nilesh Patil on 17 April, 2018 - 10:04
--बहार--
आले येथे बहार सारे उधळूनी गेले,
अंधारलेले रस्तेही असे उजळूनी गेले..।
कुठे गेले देव सारे दिवेलागणीला,
आले गनीम सारे,दिवे विझवूनी गेले..।
दुर अशा सांजवेळी फुलेही आता बहरली,
बहरलेल्या या फुलांना सारे चुरडूनी गेले..।
नभवरी चांदण्यांचा घोर कोप झाला,
टिमटिमते हे चांदणे असे निखळूनी गेले..।
हा खेळ वाटे पोरखेळ फुले फुलण्याचा,
आले येथे बहार सारे उधळूनी गेले..।
--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--
विषय:
शब्दखुणा: