कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
मॅचः भाग्यलक्ष्मी- हेवीवेट चॅम्पियनशीप
स्पर्धक: बाप्पा Vs. सरिता
व्हेन्यु: झी मराठी
दि. ३ सप्टे. २०१०
वेळ संध्या ७:३०
बहुतेक जणांनी झी मराठीवर सोमवार १६ ऑगस्ट आणि मंगळवार १७ ऑगस्टला रात्री लहान मुलांचे सारेगमप बघितले असेल. त्यावर आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या असतील. मात्र मला जे आढळले ते मी लिहितो आहे.
सोमवारचा भाग पाहिल्यानंतर असे लक्षात येते की त्यातल्यात्यात गाणार्यांचा संच होता आणि मंगळवारी चांगले गाणार्यांचा. म्हणजेच सोमवारचे बेताचे ५ राहिले आणि मंगळवारचे २ चांगले गेले. त्यातही मंगळवारच्या भागात ज्या मुलाला 'ध' पर्यंत गूण मिळाले तो बाहेर गेला आणि 'प' पर्यंत गूण मिळूनही दुसरा स्पर्धक आत राहिला. म्हणजेच कोण आत कोण बाहेर हे आधीच ठरलेले असते काय?