बहुतेक जणांनी झी मराठीवर सोमवार १६ ऑगस्ट आणि मंगळवार १७ ऑगस्टला रात्री लहान मुलांचे सारेगमप बघितले असेल. त्यावर आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या असतील. मात्र मला जे आढळले ते मी लिहितो आहे.
सोमवारचा भाग पाहिल्यानंतर असे लक्षात येते की त्यातल्यात्यात गाणार्यांचा संच होता आणि मंगळवारी चांगले गाणार्यांचा. म्हणजेच सोमवारचे बेताचे ५ राहिले आणि मंगळवारचे २ चांगले गेले. त्यातही मंगळवारच्या भागात ज्या मुलाला 'ध' पर्यंत गूण मिळाले तो बाहेर गेला आणि 'प' पर्यंत गूण मिळूनही दुसरा स्पर्धक आत राहिला. म्हणजेच कोण आत कोण बाहेर हे आधीच ठरलेले असते काय?
दुसरे म्हणजे जसे टीव्हीवर दिसते तसे प्रत्यक्षात नसते. गुणतक्ता घेऊन ५ मिनिटे परिक्षक बाहेर असतात. पुन्हा मूळच्या जागी येऊन बसतात आणि शॉट सुरू होतो. टीव्ही बघणार्यांना वाटते की तिथुनच येतात की काय!
एखाद्याला नेमके का काढले याचे कोणतेही उत्तर मिळत नाही. एका परिक्षकाचे गूण दिसतात तर दुसर्याचे दिसत नाहीत. ते न दिसणारे गूण नेमके किती हे सांगितले जात नाही. फक्त कोण आत, कोण बाहेर इतकेच सांगितले जाते.
एकूणच पद्धत आणि सादरीकरण पूर्णपणे सच्चे वाटत नाही.
तसेही संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर सध्याच्या लिटिल चँप्स कार्यपद्धतीवर नाराज आहेतच. तरीही आपल्या माहितीसाठी खालील लिंक्स पहा....
सोमवारचा भाग
http://www.youtube.com/results?search_query=sa+re+ga+ma+pa+little+champs...
मंगळवारचा भाग
http://www.youtube.com/results?search_query=sa+re+ga+ma+pa+little+champs...
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, बाहेर काढलेल्या बालगायकांचे गाणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, बाहेर काढलेल्या बालगायकांचे गाणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18350
इथे तेच चालले आहे की.
रच्याकने चांगले बालगायक किंवा गायक शोधण्यासाठी झी मराठी (किंवा अन्य कोणती वाहिनी) हे करते असे कोण म्हणते?
करमणुकीचा एक कार्यक्रम यापेक्षा जास्त त्यात गुंतण्याची गरज नाही असे माझे मत आहे (माझ्यापुरतेच).
जोशी साहेब, तुम्हाला कोणी
जोशी साहेब,
तुम्हाला कोणी संगितले हा सर्वोत्तम बालगायकाचा शोध आहे? . गेल्या वेळेस सारेगमप च्या पर्वात विजेता(ती) कोण असणार हे स्पर्धा सुरु झाल्या झाल्या गाणीही न ऐकता इथल्या मायबोलीकरानी ओळखले होते.
याही वेळचे अचुक ओळखतील स्पर्धक कोण आहेत हे कळल्यावर.
म्हणुन एक विरंगुळा म्हणुन हा कार्यक्रम पाहुन गप्पा मारायला हरकत नाही. पण उगाच ते मनाला लावुन घेउ नका. उगीच कशाला ब्लड प्रेशर वाढवायचे?