भडभुंजा
Submitted by स्टोरीटेलर on 1 February, 2018 - 19:47
आई बाबांनी आम्हा तिन्ही मुलांना इंग्रजी मीडीयम शाळेत घातलं म्हणून एका नातलगाने, " जात भडभुंजाची आणि मिजास बादशाहची!" असं काहीसं उपरोधात्मक त्यांना ऐकवलं होतं. इंग्रजी शाळांच्या फिया जास्त, आई –वडीलांच्या तोटक्या पगारात तीनही मुलांची शिक्षणं कशी होणार? अशा अर्थाचे असावे ते कदाचित. मी शेंडेफळ; त्यामुळे माझ्या समोर हे घडलं नसलं तरी त्याची वाच्चता आम्हा तीनही मुलांसमोर अनेकदा घडे. मला ही म्हण त्या न कळत्या वयातही अजिबात आवडत नसे. कारण मला भडभुंजाचे दुकान, तिथे स्वच्छ पांढऱ्या पोशाखात वेगवेगळे चविष्ठ जिन्नस विकत बसलेले काका, कढईतला घमघमणारा खमंग वास, मला खूप आवडत.
विषय: