लहरी
शांत अशा रम्य ठिकाणी, निरव शांतता असलेले, एका नदीकिनारी त्या शांत पाण्यात दगड फेकला त्यातून निर्माण झाल्या जल-लहरी.
शांत अशा एका घरात, पाळण्यात शांतपणे झोपलेले बाळ बाहेर एक चार चाकीवाहन भरधाव गेली त्या मोटार गाडीच्या आवाजाने बाळ दचकून रडू लागल्याने निर्माण झाल्या आर्त-लहरी.
शांत अशा एका मंदिरात, गण व गुरुशांत पणे ध्यानस्थ बसलेले अचानक मंदिरात प्रवेशलेले भक्ताने, जोरात घंटा वाजून निर्माण झाल्या नाद-लहरी .
शांत अशा एका शाळेत, विद्यार्थी-विद्यार्थिनी गुरुजीचे व्याख्यान ऐकताना अचानक एक वरात जाताना गीत जोराने वाजवत त्यातून निर्माण झाल्या गीत-लहरी .