गोव्यात 'माईण्डस्कोप - मेंटल हेल्थ फिल्म फेस्टिवल'
त्रिमिती ट्रस्ट ही मानसिक आरोग्यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था गेली २०१५ सालापासून मानसिक आरोग्याविषयी जागृती व्हावी, यासाठी पुणे आणि गोवा इथे चित्रपट-महोत्सवाचं आयोजन करते.
यंदा हा चित्रपट-महोत्सव गोव्यात ११ नोव्हेंबर, २०१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मडगाव इथल्या रवीन्द्र भवनात शनिवार, दि. ११ नोव्हेंबर, २०१७ रोजी दुपारी २.३० ते संध्या. ७.३० या वेळेत महोत्सवातले चित्रपट पाहता येतील.