देवा ऐकतोयस ना??
Submitted by Nikhil. on 25 September, 2017 - 06:20
देवा ऐकतोयस ना??
जास्त् काही नाही देवा
फक्त् थोडच मागतोय
गाडी,बंगला अन सेवेला नोकर
एवढच तर द्यायला सांगतोय
पण तु ऐकतोयस ना??
आधी संगीता नंतर ऐश्वर्या
मला सोडुन निघुन गेली
आता कतरिना मिळावी
एवढच तर म्हणतोय ना
देवा ऐकतोयस ना??
एकजण म्हणाला देव हळवा असतो
तपश्चर्ये ला लगेच भुलणारा असतो
म्हणुन मी हि तपश्चर्या करतोय ना
तीन ऐवजी दोन वेळाच जेवतोय ना
पण तु हे बघतोयस ना??
विषय: