कथा एका कट्ट्याची
Submitted by कुमार१ on 6 September, 2017 - 05:56
काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत.
विषय:
शब्दखुणा: