हा छंद केला

हा छंद केला

Submitted by शिवाजी उमाजी on 1 September, 2017 - 15:50

हा छंद केला

हिशोब नाही असा कधी केला
किती दु:खांशी तो संसार केला

जपत राहिलो मार्ग जगण्याचे
तरी तडजोडींना रामराम केला

व्यापारी तसा मी नाही कशाचा
मैत्री जोडण्याचाच उद्योग केला

मुके जाहले कधी आपलेच सारे
स्वतःशीच मी मस्त संवाद केला

झाल्या वेदनांना त्या शरीराच्या
हास्याचा त्यां गोड आहेर केला

ठेवून श्रद्धा राऊळी जात आलो
श्रध्देचा न आंधळा बाजार केला

म्हणती सारे असावा नाद काही
लिखावटीचा हा मुक्त छंद केला

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - हा छंद केला