बरेली की बर्फी - गोड तरीही चटकदार!
Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2017 - 07:34
इतकी निखळ रॉमकॉम हिंदीतच काय पण इंग्लिशमध्येही बर्याच दिवसांत पाहिली नव्हती! 'बरेली की बर्फी' सर्वात आधी काही असेल, तर एंटरटेनिंग आहे. निखळ धमाल करमणूक. बॉलीवूडमध्ये 'कॅरॅक्टर डेव्हलपमेंट' हा प्रकार इतक्या सुंदर रीतीने फार कमी वेळा पाहिला आहे, आणि कॉमेडीमध्ये तर जवळपास नाहीच. ह्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा ह्या 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत खर्या आहेत. लोभसवाण्या आहेत. आणि प्रत्येक अभिनेत्याने त्या अ श क्य तोलल्या आहेत. कृती सनोनला अभिनय येत असावा अशी पुसट शंका आधीपासून होती, पण 'दिलवाले' आणि 'राबता'सारख्या सिनेमांमुळे ती आशा मावळत चालली होती.
विषय: