स्वातंत्र्य माझे
Submitted by शिवाजी उमाजी on 15 August, 2017 - 04:00
स्वातंत्र्य माझे
उगा देशभक्तीचा आव आणु कशाला
विकले आहे स्वातंत्र्य माझे जगाला !
मारतो जरी रोजच बढाया कर्तृत्वाच्या
घरचेच करतात हो विरोध विरोधाला !
नाही भिती जेवढी परक्यांची इथे, मात्र
कमजोरी समजली आहे शेजाऱ्याला !
कसले स्वातंत्र्य? घेवुन बसलो आम्ही
आपसात न जमला एकोपा आम्हाला !
येणार का ईतक्यात येथे बदलांचे वारे
करतोय नुकतेच पार आम्ही सत्तरीला !
शिस्त एक पाळोनी घालवून भ्रष्टाचारा
होईल थोर राष्ट्र पाळता प्रमाणिकतेला !
विषय:
शब्दखुणा: