पेल्यात नशील्या
Submitted by शिवाजी उमाजी on 9 July, 2017 - 22:30
पेल्यात नशील्या
मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
नेत्रात कोणते या आभाळ दाटलेले
डोळे सरोवरी हे घे सावरून त्यांना
जातील बावरूनी घायाळ जाहलेले
पेल्यात या नशील्या सारेच धुंद होते
बेहोश होत गेले ते लाळ घोटलेले
सारी कथा कहानी ती वेगळीच होती
साक्षात भोगले मी ते काळ भारलेले
सोडून पाश माझे दे मोकळे करूनी
मौनात ठेव बाकी आभाळ गोठलेले
©शिवाजी सांगळे मो.+91 9545976589
विषय:
शब्दखुणा: