कास्तकारी :(
Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 25 April, 2017 - 14:14
आज पाऊस येईन
रोजच वाटतं
वाट पाह्यता पाह्यता
डोळ्यात पाणी दाटतं
मळ्यातल्या विहरीपरी
मनबीन आटतं
जमिनीतल्या भेगांसंगं
उर महं फाटतं
चिंबओल्या वावराचं
स्वप्न पहा वाटतं
कुटका गिळून पडल्यावर
झोपाच कुठं वाटतं
कर्जाच्या ओझ्यानं
सम्दं गणित हुकतं
घरगुती चिंतायनं
स्मशानगाव पेटतं
कास्तकारी करणं आता
पाप केल्यावानी वाटतं
बैलावानी मलेबी
मरून जा वाटतं
-------------------------------------------
विषय: