आजचा विषयः दीपिका पदुकोण आणि दगडु तेली मसाला
नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
"आई, यावेळच्या वाणसामानाच्या यादीत तो नेहमीचा पकाऊ साबण न टाकता लक्स टाक ग."
"अगं पण पिंकी, आपल्या ह्या साबणात काय वाईट आहे? इतकी वर्ष आपण तोच तर वापरतोय."
"वाईट नाहीये पण ती ऐश्वर्या बघ लक्स वापरते. आता त्यांना काम मिळवण्यासाठी सुंदर दिसणं भाग आहे की नाही? मग ती बेस्ट साबणच वापरणार. ए आपणही आणूया ना. बघ मग मलाही या वर्षी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भाग घेण्यासाठी मागे लागेल तो नेहमीचा गृप."
मायबोलीकरांनो,
२०१० सालच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळाची तयारी सुरु झाली आहे, तरीही तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे. तेव्हा यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सूचना इथे लिहा.
तसेच कोणाकडेही तुमच्याकडे झालेल्या गणपतीच्या आरत्या असतील तर त्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये आमच्याकडे नक्की पोचवा.