Submitted by संयोजक on 9 August, 2010 - 00:46
मायबोलीकरांनो,
२०१० सालच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळाची तयारी सुरु झाली आहे, तरीही तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे. तेव्हा यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सूचना इथे लिहा.
तसेच कोणाकडेही तुमच्याकडे झालेल्या गणपतीच्या आरत्या असतील तर त्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये आमच्याकडे नक्की पोचवा.
विषय:
Groups audience:
शेअर करा
मला सुचलेले काही धागे:( ही
मला सुचलेले काही धागे:( ही सजेशन्स स्पर्धा न घेता नुसती टॉपिक स्वरुपात पहायला जास्त आवडेल.)
* गणपती चे आकार वापरून मायबोलीकरांनी बनवलेल्या कलाकृति ( पेंटिंग्स, स्केचेस, भरतकाम , शिल्पकला इ.).
* घरच्या गणपतीची आरास .
* आठवणीतला गणेशोत्सव ( तुम्ही साजरा केलेल्या एखाद्या अविस्मरणीय गणेश उत्सवा बद्दल ललित लेख.)
* निरनिराळ्या शहरातल्या सार्वजानिक गणेश मंडळांच्या देखाव्यांचे reviews , फोटोज.
* घरच्या गणापतेच्या दररोज च्या प्रसादाच्या फोटोंचा थ्रेड.
गणपती चे आकार वापरून
गणपती चे आकार वापरून मायबोलीकरांनी बनवलेल्या कलाकृति ( पेंटिंग्स, स्केचेस, भरतकाम इ.).
डिजेला अनुमोदन. छान कल्पना आहे ही. फोटो झब्बूसाठी 'नैवेद्य' हा विषयही मस्त आहे.
पाककृती असणारच ना ? गणपती चे
पाककृती असणारच ना ?
गणपती चे आकार वापरून मायबोलीकरांनी बनवलेल्या कलाकृति ( पेंटिंग्स, स्केचेस, भरतकाम इ.).
मलाही ही कल्पना आवडली. ह्यात लहान मुलांच्याही कलाकुसर साठी वेगळा भाग ठेवलात तर बर होइल.
मला तिघींच्याही कल्पना
मला तिघींच्याही कल्पना आवडल्या
इको फ्रेंडली मुर्तींची माहिती कोणी देऊ शकल तर..
किंवा
तुम्ही (तुम्ही=सगळे) घरचा/दारचा गणेशोत्सव जास्तीत जास्त इकोफ्रेंडली/पर्यावरणाच्या दॄष्टीने चांगला करायला हातभार लावताय का? असलात तर त्याविषयी काही
निरनिराळ्या शहरातल्या
निरनिराळ्या शहरातल्या सार्वजानिक गणेश मंडळांच्या देखाव्यांचे reviews , फोटोज.>>>
ही कल्पना मस्त आहे... ठेवलीत तर मला जमेल तेव्हढे फोटो मी नक्की टाकीन...
ठेवलीत तर मला जमेल तेव्हढे
ठेवलीत तर मला जमेल तेव्हढे फोटो मी नक्की टाकीन...
<<< किंवा प्रत्येकानी आपले मस्ट वॉच टॉप १० मंडळांचे देखावे वगैरे, म्हणजे इतर मा.बो पब्लिक शॉर्ट लिस्ट करून जातील पहायला
टॉप टेन ची कल्पना मस्त
टॉप टेन ची कल्पना मस्त
<<< किंवा प्रत्येकानी आपले
<<< किंवा प्रत्येकानी आपले मस्ट वॉच टॉप १० मंडळांचे देखावे वगैरे
छान कल्पना आहे.
एखादी गायन स्पर्धा /
एखादी गायन स्पर्धा / सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करण्यासारखे असेल का?
फक्त ऑडियो क्लिप्स, स्वतःचे पेटीतबल्यातानपुर्याचीच साथ असलेले, (स्टुडियोत रेकॉर्ड केले नसलेले) सादरीकरण वगैरे. खर्या गणेशोत्सवाचा feel येईल थोडासा. नियम काय हवे ते ठरवता येतील.
इको फ्रेंडली मुर्तींची माहिती कोणी देऊ शकल तर.. >>> मस्त कल्पना.
गोष्टीला शेवट सुचवा असा एक
गोष्टीला शेवट सुचवा असा एक कार्यक्रम रोजचे रोज किंवा २-३ दिवसातून एकदा असा घेता येईल का?
उपक्रम म्हणून किंवा स्पर्धा म्हणून.
दिवाळी अंक मुखपृष्ठ स्पर्धा
दिवाळी अंक मुखपृष्ठ स्पर्धा पण असते नं दर वर्षी ?
निरनिराळ्या शहरातल्या
निरनिराळ्या शहरातल्या सार्वजानिक गणेश मंडळांच्या देखाव्यांचे reviews , फोटोज<<< ही तर मस्तच कल्पना आहे. आम्हा परदेश्स्थ भाविकांना वेगवेगळ्या ठीकाणचे बप्पा बघायला मिळतील
झब्बु तर हव्वाच
गणेशोत्सवाच्या आधी थोडे दिवस - 'गणेशोत्सव तयारी, आरास, प्रसाद इ इ' असा एखादा बाफ उघडता येइल का? लोकांना बप्पाच्या आगमनापुर्वी करण्याची तयारी, डेकोरेशन वगैरे संदर्भात आयडियाज मिळतिल
दर वेळी लोकप्रिय
दर वेळी लोकप्रिय असणार्यापैकी म्हणजे कुणालाही जास्त विचार न करता भाग घेता येणार्या स्पर्धा हव्यात !!
म्हणजे रोज नविन "फोटो कॅप्शन स्पर्धा" किंवा "फोटोतले कोण कोणाला काय म्हणाले" किंवा फोटोचा अर्धा किंवा ट्विस्ट केलेला भाग इथे देऊन सेलेब्रिटी ओळखणे , शब्द किंवा चित्र कोड्याचे प्रकार..
माबोवर बरेच कवी, लेखक आहेत.
माबोवर बरेच कवी, लेखक आहेत. त्यांच्यासाठी, गणेश स्त्रोत्र/प्रार्थना/स्तुतीपर काव्य लेखन स्पर्धा घेता येईल.
गेल्यावर्षीच्या झब्बू, कथा
गेल्यावर्षीच्या झब्बू, कथा पुढे नेणं (सूतकताईच नाव होत ना?), विडंबन स्पर्धा कल्पना पण मस्तच होत्या.
वर दिलेल्या सगळ्याच कल्पना
वर दिलेल्या सगळ्याच कल्पना मस्त आहेत.
मागील वर्षी भरवली गेलेली लहान मुलांसाठी असलेली गायनाची स्पर्धा राबवता येइल का अथवा गणेशोत्सव थीम म्हणून अष्टविनायकांची माहिती तसेच महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील असलेले गणपतीस्थानांची माहिती (सचित्र-नकाशा सहित) देता येईल काय?
रंगासेठ, अष्टविनायकांची
रंगासेठ, अष्टविनायकांची चित्रांसहीत माहिती अशी एक मालिका गेल्या वर्षी सादर करण्यात आली होती.
महाराष्ट्राबाहेरील असलेले गणपतीस्थानांची माहिती हा एक सुंदर विषय आहे. तसेच आपल्या गड-किल्ल्यांवरील गणेश अथवा इतर मंदिरांची माहिती हा पण एक चांगला विषय होऊ शकेल.
>>दर वेळी लोकप्रिय
>>दर वेळी लोकप्रिय असणार्यापैकी म्हणजे कुणालाही जास्त विचार न करता भाग घेता येणार्या स्पर्धा हव्यात !!
म्हणजे रोज नविन "फोटो कॅप्शन स्पर्धा" किंवा "फोटोतले कोण कोणाला काय म्हणाले" किंवा फोटोचा अर्धा किंवा ट्विस्ट केलेला भाग इथे देऊन सेलेब्रिटी ओळखणे , शब्द किंवा चित्र कोड्याचे प्रकार..
खुप सारे अनुमोदक..... अगदी हेच लिहायला मी इथे आलो होतो.... विशेष स्पर्धाच्या जोडीला सोप्या स्पर्धा असतील तर जास्तीत जास्त माबोकरांना सहभागी होता येते.
अश्या स्पर्धांसाठी अजुन एक कल्पना... अॅड मॅड शो
रोजच्या रोज एक फनी प्रॉडक्ट द्यायचे आणि त्यावर मॅड कॅम्पेनिंग (स्लोगन, कॅचलाइन, जिंगल) करायचे!
क्रुपया सार्वजनिक
क्रुपया सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्व धागे एका ग्रुप साठी मर्यादित न ठेवता सार्वजनिक करता आले तर बरे होइल.
मायबोलिचे सभासद नसलेले अनेक लोक किंवा रॉम मधे असलेले सभासद यांना ग्रुप साठि असलेले धागे दिसत नाहित.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्व
सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्व धागे एका ग्रुप साठी मर्यादित न ठेवता सार्वजनिक करता आले तर बरे होइल>>
गणेशोत्सवाचे सर्व धागे सर्वांसाठी नेहेमीच खुलेच असतात.तुम्हाला कुठला धागा पहाता आला नाही का?
व्यंगचित्र स्पर्धा, इको
व्यंगचित्र स्पर्धा, इको फ्रेंडली मखर स्पर्धा, मुलांसाठी कथाकथन स्पर्धा (रेकॉर्ड करुन पाठवायचे) घेता येईल का?
गणपतींसाठी जी आरास केली जाते,
गणपतींसाठी जी आरास केली जाते, त्याचं recycling करता येइल का ? हा eco friendliness चा एक भाग समजायला हरकत नसावी. विशेषत: परदेशात एका गावात / जवळपासच्या गावांमधे राहणार्या लोकांनी / मंडळांनी डेकोरेशन ची अदलाबदल केली तर खर्च आणि वेळ वाचु शकेल. माबो च्या माध्यमातुन असा उपक्रम राबवता येइल.
चारोळ्यांचा झब्बू. दररोज एका
चारोळ्यांचा झब्बू.
दररोज एका चारोळीने सुरूवात करायची. तिला प्रत्युत्तर म्हणून पुढची चारोळी, दुसरीला प्रत्युत्तर म्हणून तिसरी... या खेळात खूप धमाल येते.
चारोळ्या शक्यतो मिटरमधे बसणार्या हव्यात. सगळ्याच काही अगदी जड जड शब्द वापरून करायला हव्यात असं नाही. हलक्याफुलक्याही चालतील. इन फॅक्ट, एखाद्या हलक्या फुलक्या चारोळीने आधीचा ट्रॅक अचानक बदलला जातो आणि मग अजून मजा येते.
माबोकरां काढलेले फोटो
माबोकरां काढलेले फोटो प्रदर्शन ठेवता येईल ...
निर्माल्याचे रिसायकलिंग ह्या
निर्माल्याचे रिसायकलिंग ह्या विषयावरही काही स्पर्धा घेता येतील का?
वा वा, मस्त वातावरण तयार
वा वा, मस्त वातावरण तयार होतय. आता धमाल येणार!!
>>> गेल्यावर्षीच्या झब्बू, कथा पुढे नेणं (सूतकताईच नाव होत ना?), विडंबन स्पर्धा कल्पना पण मस्तच होत्या. >>> हो ग कविता, मला सुतकताई जाम आवडलं होतं. काय एकेकाचं डोकं चालायचं, हहपुवा व्हायची. सुतकताई हा प्रकार मला नवीन होता.
परिसंवाद ठेवता का? मायबोली-
परिसंवाद ठेवता का?
मायबोली- रेट्रो असे नाव ठेवा, आणि V & C ठेवा. काय दणक्यात रिस्पॉन्स येईल. पण महत्वाच्या आयडींना आधीच भाग घ्यायला सांगा मात्र.
माबोकरां काढलेले फोटो
माबोकरां काढलेले फोटो प्रदर्शन ठेवता येईल ... <<< अनिलजी, अगदी खरं आहे... भारत अन महाराष्ट्रातील लोककलेचे अन विविध भाषीय संस्कॄतीचे दर्शन घडवणार्या प्रकाशचित्रांची मालिका इथे गणेश उत्सवाच्या काळात बघायला नक्की आवडेल.
रैना, कल्पना चांगली आहे..
रैना,
कल्पना चांगली आहे.. फक्त तबला पेटीचे बंधन नको. सर्व प्रकारे आरत्या मा.बो. करांन्नी संगीतबद्ध्ध केलेल्या वा गायलेल्या देता येतील.
फक्त आरत्या नको, गाणी असली
फक्त आरत्या नको, गाणी असली तरी चालतील योग. आरत्या म्हणल्या की लिमीट येते.
Pages