तुझ्या आठवणी पुन्हा नव्याने आठवताना
Submitted by राम पाटील on 30 November, 2016 - 19:12
तशी सायंकाळ ची वेळ असेल , मन खूप थकलेलं होत. रोज रोज तोच दिनक्रम करून कंटाळा आला होता.म्हणून कुठेतरी फिरायला जायचा विचार आला म्हणून निघालो , बाहेर पडल्यावर कायम सोबत असणारी जोडीदारींन होतीच (बाइक)..एखादं शांत वातावरण हवं होतं जिथं माझ्या मनाला शांतता लाभेल, विचारांचा काहूर थांबेल,लांब असा दूरवर आलो ..रस्त्याच्या वळणावरून एक कच्च रस्ता होता....दूरवर पहिलं तर एक छोटंसं मंदिर दिसलं ,गाडीला तशीच किक मारली नि त्या रस्त्यानं निघालो ,पाच दहा मिनिटातच माझी स्वारी पोचली तिथं.बसण्यासाठी छानशी एका झाडाखाली जागा पहिली.
विषय:
शब्दखुणा: