युग्म! Submitted by चिट्टी on 7 October, 2016 - 05:15 माझ्या ओठांच्या सायीला तुझ्या ओठांची साखर माझ्या भिजल्या मनाला तुझ्या पंखांची पाखर माझ्या अंगांगा लाभावी तुझ्या स्पर्शाचीच लेणी नकळतशी सुटावी माझ्या पाठीवर वेणी तुझा श्वास माझा श्वास व्हावे हवेनेही कुंद युग्म भारले पाहता यामिनीने व्हावे धुंद विषय: अर्थकारणनातीगोतीशब्दखुणा: युग्म