संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by भारती बिर्जे.. on 15 September, 2016 - 10:28

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

साहेब

सह्या करा रे मस्टरवरती
मोठ्या साहेबाची फिरती
येते आहे तासभराने
उचला पेने ! भरा रकाने !

गुलाबबाई तुम्ही पुढे या
काय राहिले पेंडिंग सांगा
ट्रायल बॅलन्स आहे बाकी ?
कुठे लपू मी ? टेबलखाली ?

एटीएमच्या कॅशचे पुढे
गेले का ते अडेल गाडे
टार्गेट्सचे मासिक तक्ते
मीच बनवतो , पुरे करा ते !

चहा समोसे घेऊन खाती
चला आवरा , वेळ न हाती
आरामाचे चित्र अहाहा
बदल्या होऊन बदलेल पहा !

गुलाबबाई

ट्रायल बॅलन्स बाकी राहे

Subscribe to RSS - संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद