पडूद्या की प्रश्न! - श्री. केतन दंडारे
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असतानाची गोष्ट. त्या सुमारास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मत व्यक्त केले होते की, दुसर्या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण झालेच नाही, ज्यूंचे हत्याकांड हा केवळ एक बनाव आहे. या विधानाचा अर्थात सार्वत्रिक निषेध झाला. पण विद्यापीठातील आर्थर बट्झ नामक एका सहयोगी प्राध्यापकाने मात्र त्यांच्या खाजगी वेबपेजवर या विधानाचे समर्थन केले. असे करण्याची या बट्झमहाशयांची पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी आधीसुद्धा अश्याच स्वरुपाची विधाने केली आहेत. थोडक्यात, त्यांची ही मते सर्वज्ञात आहेत. हे प्रकरण जेव्हा पेटले तेव्हा मला वाटले की आता ह्यांना डच्चू मिळणार. तर तसे काहीच झाले नाही.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा