जागणे आता नको ...तरही
Submitted by डॉर्सी on 19 August, 2016 - 06:46
आठवांना आठवत मी जागणे आता नको
("हे असे आभासवाणे चांदणे आता नको")
मी तुझ्या प्रेमात वैरी कैकदा केले मला
येवढे माझे स्वताः शी भांडणे आता नको
तू कितीदा तोडला आहे भरवसा आमचा
ईश्वरा खोटे दिलासे मागणे आता नको
मी सुखाची वाट माझ्या जीवनी पाहू किती
यातना दारातली नाकारणे आता नको
केवढे धुत्कारले अन टाळले त्यांनी मला
वाटते माझे मला कवटाळणे आता नको
-डॉर्सी
विषय:
शब्दखुणा: