काल सोडले तुला खरेच का?

काल सोडले तुला खरेच का?

Submitted by डॉर्सी on 19 August, 2016 - 03:13

काल सोडले तुला खरेच का?
(बंध सर्व तोडले मधेच का?)

रोजची असंख्य उत्तरे दिली
प्रश्न राहिले तरी बरेच का?

उदास खिन्न रोज रोज वाटते
दु:ख ज्यास बोलतात हेच का?

मार्ग काढले जरी अनेक मी
येत राहिले नवीन पेच का?

मी जगास आज काल टाळतो
चेहरे दिसे मला तिचेच का?

ऐकले कधी कुठे जगात मी
बोललो असेच का?तसेच का?
-डॉर्सी

विषय: 
Subscribe to RSS - काल सोडले तुला खरेच का?