माणुस मिळतो स्वस्तामध्धे

गझल

Submitted by डॉर्सी on 18 August, 2016 - 08:18

दुनियेला मी दावत नाही घाव कधीही
आणत नाही खोटा खोटा आव कधीही

माणुस मिळतो स्वस्तामध्धे, महाग वस्तू
राजकारणी कोठे बघतो भाव कधीही

किती असावी खोल मनाची जखम,दिलेली
मला न घेता आला याचा ठाव कधीही

प्रेम ,भावना ,मदत ,ऐकता, आपुलकी पण,
मला न दिसले स्वप्नांमधले गाव कधीही

नावानंतर तिच्या कुणाचे नाव असू दे
ना विसरावे मनात मझे नाव कधीही

नियती जे जे खेळ म्हणाली खेळत गेलो
अर्ध्यावरुनी कुठे सोडला डाव कधीही

माझी किंमत कधीच त्यांना कळली नाही
लावत गेले हवे हवे ते भाव कधीही
--डॉर्सी

Subscribe to RSS - माणुस मिळतो स्वस्तामध्धे