उदासीन मागासलेल्या जमाती
Submitted by बेफ़िकीर on 17 August, 2016 - 11:49
उदासीन मागासलेल्या जमाती, निरुत्साह सरकारतर्फे सदा
नसे हक्क एकास माहीत अन् आणतो एक हक्कांवरी त्या गदा
मुलांना जिला पाजता येत नाही, खपे एक शेतात महिला अशी
पिके नेक मिंधी बुळ्या पावसाची नि तान्ही तिची खंगती सर्वदा
म्हणाली दरी, काय कवटाळता उंच ह्या पर्वतांच्या समस्या तुम्ही
मला जर बुजवलेत, देशात कोठे न लागेल काढायला बोगदा
कुणाला हवे सांग स्वातंत्र्य असले, दवडलीत मी सात दशके जिथे
नको त्या ठिकाणी हलाखी सदा तर नको त्या ठिकाणी सदा संपदा
स्वतःवाचुनी ज्यास मी भेटतो तो निराळाच कोणी कसा वाटतो
'जिथे एवढी लोकसंख्या तिथे सांग जाती कश्या तेवढ्या' एकदा
=============
विषय:
शब्दखुणा: